विद्यापीठाकडून विविध क्रीडा प्रकारातील निवड चाचणी स्पर्धा संपन्न

  • By admin
  • November 16, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

नाशिक : राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव व अखिल भारतीय विद्यापीठ संघ क्रीडा स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या विविध निवड चाचणी स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यापीठ मुख्यालय परिसरात टेबल टेनिस व लॉन टेनिस, पंचवटी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बुद्धिबळ, नाशिक जिमखाना येथे बॅडमिंटन तर स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव येथे जलतरण स्पर्धांचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील राज्यस्तरीय व अखिल भारतीय विद्यापीठ संघ स्पर्धेसाठी विविध संलग्नित महाविद्यालयातील खेळाडूंकडून प्रवेशिका मागवून चाचण्या घेण्यात आल्या. एकूण १२५ पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पाच क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येक खेळासाठी अनुभवी तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

लॉन टेनिसमध्ये मॉडर्न कॉलेज, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, एमजीएमआयएस, के जे सोमय्या, अश्विनी रफरेल इत्यादी महाविद्यालयातील इशान बिजवे, श्लोक गांधी, पुलकीत गुप्ता, आदित्य तलाठी, आदित्य जहागीरदार, अक्षया मेहता, वैदेही काळे, समृद्धी अग्रवाल, स्वराज चेके व निहारिका पाठक यांनी चमकदार कामगिरी करत निवड मिळवली.

टेबल टेनिसमध्ये एलटीएमएमसी, टीएएमव्ही, आयडियल आयुर्वेद, एएफएमसी, अश्विनी रफरेल, सिंहगड दंत, काशीबाई नवले भौतिकोपचार व अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. जलतरणमध्ये एमजीएमआयएस, पीएमटी शेवगाव, एसजीपीआयईएस, एमजीएमआयओपी, एसएमबीटी, के.जे. सोमय्या, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय, सावरकर होमिओपॅथी व ज्युपिटर आयुर्वेद महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

बुद्धिबळ स्पर्धेत एचबीटी मेडिकल, ग्रँट मेडिकल, व्हीएम शासकीय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद, एलटीएमएमसी व तेरणा मेडिकल महाविद्यालयांतील विद्यार्थी निवडले गेले. तर बॅडमिंटनमध्ये ग्रँट शासकीय, नागपूर शासकीय, एचबीटी मेडिकल, एनकेपी साळवे, केएएमबीई दंत, मोतीवाला फिजिओथेरपी, काशीबाई नवले व एचबीटीएमसी महाविद्यालयांतील खेळाडूंनी स्थान मिळवले.

या स्पर्धांचे समन्वयन श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद आवारे यांनी केले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *