सोलापूर ः कुमार-मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या मैदानावर २२ व २३ नोव्हेंबर रोजी होईल.
ही स्पर्धा सोलापूर सोलापूर खो-खो ॲम्युचर असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. या स्पर्धेतून अहिल्यानगर येथे ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ५१वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी जिल्ह्याचे संघ निवडण्यात येणार आहेत.
२२ नोव्हेंबरला कुमार तर २३ नोव्हेंबरला मुलींच्या स्पर्धा होतील. या स्पर्धेसाठी कुमार-मुली १८ वर्षांखालील म्हणजेच ५ जानेवारी २००८ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत. तसेच कुमार-मुलीसाठी वय (वर्ष) उंची (सेमी) वजन (कि ग्रॅ) २५० असे मूल्यांकन असेल.
कुमार-मुली खेळाडू जास्तीत जास्त बीए, बीकॉम, बीएससी. प्रथम वर्ष अथवा त्याखालील वर्गात शिकत असला पाहिजे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जे कुमार-मुली दहावी उत्तीर्ण आहेत त्यांनी त्यांचे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट व जे १२ उत्तीर्ण व त्याखालील इयत्तेत आहेत, त्यांनी दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व त्याखालील वर्गातील शिकत असलेल्या खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला व आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. संबंधित कुमार व मुली हे हे सोलापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात शिकणारे असले पाहिजे
प्रवेश शुल्क भरल्याशिवाय भाग्यपत्रिकेत संघाचे नाव समाविष्ट करण्यात येणार नाही याची इच्छुक संघानी नोंद घ्यावी. संलग्न जिल्हा संघांनी संघटनेचे खजिनदार श्रीरंग बनसोडे (96991 75798) यांच्याकडे प्रवेश शुल्कासह नोंदणी करावी. असे आवाहन सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सचिव उमाकांत गायकवाड यांनी केले आहे.


