राज्य शालेय तलवारबाजी स्पर्धेची जल्लोषात सांगता
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्या आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती संभाजीनगर विभागाने पटकावले. द्वितीय क्रमांक पुणे विभागाने तर तृतीय क्रमांक लातूर विभागाने संपादन केला आहे.
पारितोषिक वितरण छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस उदय डोंगरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ दिनेश वंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा अंतिम निकाल
फॉईल सांघिक मुली ः १. छत्रपती संभाजीनगर, २. पुणे, ३. मुंबई, ४. नाशिक. इपी सांघिक मुली ः १. लातूर, २. मुंबई, ३. पुणे, ४. अमरावती. सेबर सांघिक मुली ः १. कोल्हापूर, २. छत्रपती संभाजीनगर, ३. नागपूर, ४. लातूर. फॉईल सांघिक मुले ः १. पुणे, २. लातूर, ३. अमरावती, ४. छत्रपती संभाजीनगर. इपी सांघिक मुले ः १. लातूर, २. पुणे, ३. नाशिक, ४. छत्रपती संभाजीनगर. सेबर सांघिक मुले ः १. छत्रपती संभाजीनगर, २. पुणे, ३. मुंबई, ४. लातूर.
फॉईल वैयक्तिक मुली ः १. शौर्या इंगवले (पुणे), २. स्वामिनी डोंगरे (छत्रपती संभाजीनगर), ३. वैष्णवी कावळे (छत्रपती संभाजीनगर), ४. समारा पेवेकर (मुंबई).
इपी वैयक्तिक मुली ः १. स्मिता गुट्टे (लातूर), २. माही कुलकर्णी (लातूर), ३. कृतिका राठोड (छत्रपती संभाजीनगर), ४. श्रिया क्षीरसागर (कोल्हापूर).
सेबर वैयक्तिक मुली ः १. अनन्या वरखेडे (कोल्हापूर), २. श्रेया मोईम (छत्रपती संभाजीनगर), ३. दुर्वा बारई (नागपूर), ४. रिद्धी कणसे (कोल्हापूर).
फॉईल वैयक्तिक मुले ः १. समर्थ डोंगरे (छत्रपती संभाजीनगर), २. कवीश उत्तेकर (पुणे), ३. रित्विक हुमणे (नागपूर), ४. आकाश यादव (मुंबई).
इपी वैयक्तिक मुले ः १. अनंत साठे (पुणे), २. जनमेजय नाईक (कोल्हापूर), ३. विरळ म्हस्के (नाशिक), ४. आदित्य बांगर (नाशिक).
सेबर वैयक्तिक मुले ः १. वेदांत काळे (छत्रपती संभाजीनगर), २. आरव नागदेव (नागपूर), ३. अर्णव ढवळे (मुंबई), ४. विराट जाधव (अमरावती).
वैयक्तिक प्रकारातील विजय खेळाडूंची राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व क्रीडा अधिकारी मार्गदर्शन तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.


