मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बाल दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित व्ही प्रिजेशने १४ वर्षाखालील, धैर्या बिजलवानने ११ वर्षाखालील तर आयांश महेशने ८ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकाविले.
प्रमुख प्रतिस्पर्धी फिडे गुणांकित गोकर्ण औटीचे (४ गुण) आव्हान मागे टाकत अपराजित व्ही प्रिजेशने सर्वाधिक ४.५ गुणासह प्रथम स्थानावर झेप घेतली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रतिनिधी क्षितिजा कद्रे, जिपिओ मुंबई विभागीय अधिकारी केया अरोरा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्यीत एलआयसी-आयडियल शालेय बुद्धिबळ स्पर्धेमधील १४ वर्षांखालील व्ही प्रिजेशने (४.५ गुण) प्रथम, गोकर्ण औटीने (४ गुण) द्वितीय, प्रणव जैनने (३.५ गुण) तृतीय, समर्थ साळगावकरने (३.५ गुण) चौथा, राज गायकवाडने (३ गुण) पाचवा, अद्वैत पाटीलने (३ गुण) सहावा, समकीत संघवीने (२,५ गुण) सातवा, पार्थ सराधीने (२ गुण) आठवा क्रमांक मिळवला ; ११ वर्षाखालील गटात धैर्या बिजलवानने (४.५ गुण) प्रथम, वंश धांडेने (४ गुण) द्वितीय, योहान्न जैनने (३.५ गुण) तृतीय, अंगद पाटीलने (३ गुण) चौथा, अर्णव जगतापने (३ गुण) पाचवा, प्रिथिल जैनने (३ गुण) सहावा, कार्तिकेय सावंतने (३ गुण) सातवा, सार्थक शर्माने (३ गुण) आठवा क्रमांक पटकावला. ८ वर्षाखालील गटात आयांश महेशने (५ गुण) प्रथम, आर्शिव गोयलने (४ गुण) द्वितीय, समैरा थोरातने (३.५ गुण) तृतीय, आयुष जैठलीयाने (३ गुण) चौथा, साहस जाधवने (३ गुण) पाचवा, साध्या जाधवने (३ गुण) सहावा, युवान अरोराने (२.५ गुण) सातवा, जितेज गोडगेने (२ गुण) आठवा पुरस्कार मिळविला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील १२२ खेळाडूंनी स्पर्धेमध्ये भाग घेतला.


