छत्रपती संभाजीनगर ः जालना येथे झालेल्या आंतर शालेय विभागीय कराटे स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटात ७४ किलो वजन गटात धर्मवीर संभाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मानव वराडे याने सुवर्णपदक प्राप्त केले.
या सुवर्ण कामगिरीमुळे बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी मानव वराडे याची निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, सचिव निवृत्ती पाटील गावंडे, मुख्याध्यापक लक्ष्मण मेमाणे, पर्यवेक्षक दिलीप गायके, सोमनाथ मेटे, प्रियंका उज्जैनकर तसेच क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत, पालक व सर्व शिक्षकांनी मानवचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


