जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनी स्त्रीशक्तीचा गौरव 

  • By admin
  • November 17, 2025
  • 0
  • 99 Views
Spread the love

यवतमाळ ः यवतमाळ येथील जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनी स्त्रीशक्तीच्या गौरवाचा अनोखा सोहळा उत्साहात पार पडला. “आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी” या संस्थेमध्ये शिकणाऱ्या ५३ मुलींसह संस्थेच्या अध्यक्षा पपीताताई माळवे आणि ईशुभाऊ माळवे यांचा सन्मान करण्यात आला. 

या उपक्रमामागे प्राचार्य योगेशसिंह चौहान यांची प्रेरणा आणि पर्यवेक्षक किरण फुलझेले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अधिक उठावदार झाला.

पपीताताई यांनी पारधी समाजाच्या उद्धारणाची संघर्षमय कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच इंग्रजी विषयाचे शिक्षक विपुल मरसकोल्हे यांनी तीन महिने विनामूल्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या कथेमधील करुणा, चिकाटी आणि शिक्षणाचा दीप विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन गेला.शाळेतर्फे सावित्रीच्या लेकींना स्केटिंग, व्हॉलीबॉल, फुटबॉल, वह्या, पेन आणि चित्रकला साहित्य अशा शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी ‘मुठभर धान्य’ उपक्रमातून धान्य व कपडे गोळा करून मानवतेचा सुंदर संदेश दिला. लेकींनी शाळेचे विभाग पाहून डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेतला.मुख्याध्यापक योगेशसिंह चौहान यांनी पपीताताई–ईशुभाऊ यांच्या कार्याचे कौतुक करून शिक्षणातून स्त्रीशक्ती जागविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बिस्किट वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला. संस्कृती काळे आणि भक्ती अगस्ती यांनी सुटसुटीत सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षक अध्यक्ष सुभाष जैन, उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, गुरुबक्ष आहुजा शाळेचे सचिव रमेश छेडा, कोषाध्यक्ष सुहास चिद्दरवार, मुकुंद औदार्य, प्रकाश चोपडा, डॉक्टर सुरेंद्र पद्मावार यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *