मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बाल दिनानिमित्त झालेल्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अपराजित आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू व्ही प्रिजेशने १३ व १४ वर्षाखालील दोन्ही वयोगटाचे विजेतेपद पटकावून एकमेव डबल धमाका केला. दोन्ही गटात पाचही साखळी सामन्यांमध्ये सर्वांगसुंदर खेळ करीत प्रिजेशने निर्विवाद वर्चस्व राखले.
१० वर्षाखालील वयोगटात फिडे गुणांकित अनिश्का बियाणीने निर्णायक चुरशीच्या लढतीत वंश धांडे याला हरवून प्रथम स्थानावर झेप घेतली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा संघटक निवृत्ती देसाई, क्रीडाप्रेमी क्षितिजा कद्रे, प्रकाश लब्धे, फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, क्रीडापटू प्रमोद पार्टे, सुनील बोरकर, किशोर रहाटे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे आदी जिल्ह्यातील एकूण शालेय १२२ खेळाडूंनी भाग घेतला. एलआयसी-आयडियल शालेय बुद्धिबळ स्पर्धेमधील १३ वर्षाखालील व्ही प्रिजेशने (४.५ गुण) प्रथम, अधवान ओसवालने (४ गुण) द्वितीय, गोकर्ण औटीने (४ गुण) तृतीय, राज गायकवाडने (३.५ गुण) चौथा, धैर्याने (३ गुण) पाचवा, मनोमय शिंगटेने (३ गुण) सहावा, अथर्व सक्सेनाने (३ गुण) सातवा, मोहमद अन्सारीने (३ गुण) आठवा क्रमांक मिळवला.
१० वर्षाखालील गटात अनिश्का बियाणीने (५ गुण) प्रथम, वंश धांडेने (४ गुण) द्वितीय, अहान कातारुकाने (४ गुण) तृतीय, आहील शेखने (४ गुण) चौथा, वृशांकने (३.५ गुण) पाचवा, मार्तंड गजनेने (३ गुण) सहावा, जीतेज गाडगेने (३ गुण) सातवा, ध्रुव सिंगने (३ गुण) आठवा आणि ईशा मंगलापल्लीने (४ गुण) प्रथम, समैरा थोरातने (३ गुण) द्वितीय, अमन बियाणीने (३ गुण) तृतीय, स्वंकित मोहंतीने (३ गुण) चौथा, साध्या जाधवने (२ गुण) पाचवा, साहस जाधवने (२ गुण) सहावा, ध्वेन कादाकीयाने (२ गुण) सातवा, आयांश बियाणीने (२ गुण) आठवा पुरस्कार जिंकला.


