मुंबई ः माजी खासदार मनोज कोटक यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल क्रीडा वेध मुंबई या क्रीडा संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट, मुंबई मनपा शारीरिकच्या शारीरिक शिक्षण शिक्षकांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्र हे मोठे झाले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाला संघटनेला न्याय मिळेल अशी भूमिका आपण घेऊ असे प्रतिपादन माजी खासदार मनोज कोटक यांनी यावेळी केले. या प्रसंगी क्रीडा वेध संघटनेचे प्रमुख कार्यवाहक महेंद्र चेंबूरकर तसेच गुरुनाथ मिडबावकर, सतीश कदम, राहुल वाघमारे, पी रामस्वामी, ज्योती पगारे, सोनाली बोराडे, आदित्य खससे, अनिल पाटील व शारीरिक शिक्षण शिक्षक युनिटचे प्रमुख कार्यवाह डॉ जितेंद्र लिंबकर उपस्थित होते.


