धाराशिव जिल्हा ज्युनियर हँडबाॅल संघाची निवड चाचणी बुधवारी

  • By admin
  • November 18, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

धाराशिव ः राज्यस्तरीय ज्युनियर मुले गटाची स्पर्धा लोणंद (जिल्हा सातारा) येथे ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, यात सहभागी होण्यासाठी जनता विद्यालय येडशी येथे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवड चाचणी होणार आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूचा जन्म दिनांक १-१-२००६ नंतरचा असावा. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे. या निवड चाचणी चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सचिव कुलदीप सावंत, सहसचिव सचिन मुद्दे, गुरुनाथ माळी, आशिष भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *