२०२५ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक भरगच्च 

  • By admin
  • January 1, 2025
  • 2
  • 60 Views
Spread the love
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२४ हे वर्ष संमिश्र राहिले. टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी प्रचंड निराशाजनक ठरली. खास करुन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता नव्या वर्षात भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.
नव्या वर्षात भारतीय संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी २० सामन्यांसह ५० हून अधिक सामने खेळायचे आहेत. हे वेळापत्रक खेळाडू आणि चाहत्यांसाठी रोमांच आणि आव्हानांनी भरलेले असेल.फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड

पहिला वन-डे : ६ फेब्रुवारी (नागपूर)
दुसरा वन-डे : ९ फेब्रुवारी (कटक)
तिसरा वन-डे : १२ फेब्रुवारी (हैदराबाद)फेब्रुवारी-मार्च : चॅम्पियन्स ट्रॉफी 

२० फेब्रुवारी : भारत विरुद्ध बांगलादेश (दुबई)
२३ फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
२ मार्च : भारत विरुद्ध न्यूझीलंड (दुबई)
ऑगस्ट : भारत विरुद्ध बांगलादेश
भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाईल.नोव्हेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

नोव्हेंबर-डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारतीय संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका संघासोबत तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

२०२५ मध्ये टी २० आशिया कपही खेळवला जाणार आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.

2 comments on “२०२५ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक भरगच्च 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *