धमाकेदार अर्धशतकासह ऋषभ पंतने रचला नवा इतिहास 

  • By admin
  • January 4, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

सिडनी : सिडनी कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने ऐतिहासिक पराक्रम केला. २९ चेंडूत अर्धशतक ठोकताना पंत याने  कपिल देव, गौतम  गंभीर यांचा विक्रम मोडला. 

सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत याने स्फोटक फलंदाजी करून चाहत्यांची मने जिंकली. पंतने अवघ्या २९ चेंडूत अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थक्क केले. पंतने भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. भारताकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पंतच्या नावावर आहे. २०२२ साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक झळकावण्यात पंत यशस्वी ठरला होता. 

गंभीरचा विक्रम मोडला 
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पंत ३३ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला होता. ६१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारण्यात पंतला यश आले. पंत ६१ धावांवर बाद झाला असला तरी या डावखुऱ्या फलंदाजाने संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा खास विक्रम मोडीत काढला. ऋषभ पंतने आता त्याचे सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कसोटी धावांचा आकडा (१८३२) त्याच्या मायदेशात मागे टाकण्यात यश मिळवले आहे. पंतने आतापर्यंत भारताबाहेर २९ कसोटी सामने खेळले असून १८४२ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, गौतम गंभीरने भारताबाहेर कसोटीत एकूण २४ सामने खेळले आणि या काळात तो १८३२ धावा करण्यात यशस्वी ठरला. गंभीरने भारताबाहेर कसोटीत ४ शतके आणि १० अर्धशतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

पंतने इतिहास रचला
याशिवाय, ऋषभ पंत कसोटीत ५० प्लस स्कोअरमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. पंतने दुसऱ्या डावात ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी करत १८४.८५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. 

पंतने रिचर्ड्सची केली बरोबरी 

पंत याने १५० प्लस स्ट्राइक रेटसह कसोटीत सर्वाधिक ५० प्लस धावा करणाऱ्या खेळाडूंच्या महान यादीत सामील झाला आहे. पंतने या बाबतीत महान व्हिव्हियन रिचर्ड्सची बरोबरी केली आहे. या यादीत व्हिव्ह रिचर्ड्स (२), बेन स्टोक्स (२) यांच्या पाठोपाठ आता ऋषभ पंत (२) आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *