नांदेड : नांदेड शहरातील क्रिकेटपटूंना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्या मिताली क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) करण्यात येणार आहे, अशी माहिती मिताली क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक नंदकिशोर कुष्णुरे पाटील यांनी दिली.
मिताली क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेली प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी मार्टजवळ, कॅनल रोड नांदेड या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चांदोजी पावडे मंगल कार्यालयाचे संचालक नारायणराव पावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सहसचिव संतोष बोबडे हे अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांची उपस्थिती असणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. अशोक तेरकर, परभणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारराव शिवारकर, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अॅड. आशिष गोधमगावकर, हिंगोली पोलिस निरीक्षक नागोराव जाधव, नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष मंगेश कामटीकर, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पंच दर्शनकुमार खेडकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती नंदकिशोर कुष्णुरे पाटील यांनी दिली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील आहेरे, किशोर पावडे, सुनील जाधव, परमेश्वर मोरे, अजिंक्य लाटकर, तेजस हैबते यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
…