
राज्य एन्ड्युरन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कोरे यांची माहिती
पुणे : महाराष्ट्र राज्य एन्ड्युरन्स असोसिएशनच्या अधिकृत महाराष्ट्र राज्य एन्ड्युरन्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन विरार येथे ११ व १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एन्ड्युरन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली.
विरार येथील अमेय स्केटिंग क्लासेस या ठिकाणी दोन दिवस महाराष्ट्र राज्य एन्ड्युरन्स चॅम्पियनशिप रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील २३ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यात अहिल्यानगर, अकोला, अमरावती, मीरा भाईंदर, चंद्रपूर, जळगाव, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पीसीएमसी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत १३०० पेक्षा अधिक खेळआडूंचा सहभाग असणार आहे. तसेच १८० पेक्षा अधिक प्रशिक्षक, ५८ ऑफिशियल, १५ संयोजक टीम असा मोठा सहभाग असणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणार आहे. राज्य संघटनेचे चीफ रेफ्री दशरथ बंड यांनी सांगितले. या स्पर्धेच्या आयोजना संदर्भात आणि राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विरार येथे आयोजित करण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे सेक्रेटरी मनोज ठाकरे यांनी दिली.