महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघात ७५ खेळाडूंचा समावेश

  • By admin
  • January 4, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

रांची येथे रविवारपासून राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ 

छत्रपती संभाजीनगर : रांची (झारखंड) येथे पाच ते आठ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अंडर १९ मुला-मुलींचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. 

अंडर १९ राज्यस्तरीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन डेरवण व पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी महाराष्ट्राचा संघ अंतिम करण्यात आला. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्राचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. महाराष्ट्र संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून रामकिशन मायंदे, क्रीडा अधिकारी अविनाश पाटील तर क्रीडा मार्गदर्शक अरविंद चव्हाण व पूनम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघास जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात ३९ आणि मुलींच्या संघात ३६ खेळाडूंचा समावेश आहे. 

महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघ

मुलांचा संघ : आदि पुजारी, रुद्र शिंदे, प्रदीप माने, राजेंद्र इंपाळ, हर्षल जोगे, ओमकार अदावकर, अथर्व मोरे, अभिनंदन सूर्यवंशी, रोहित बिन्नर, सैफ चाफेकर, सार्थक बेलवटे, तेजस नाईक, प्रणव गवंडी, सिद्धेश परीट, राजन सिंग, अभिषेक शर्मा, स्मित चौरे, विशाल सिंग, रेहान पटाईत, निलवेद कोल्हे, तुकाराम माटेकर, ओमकार भापकर, आर्यन सातपुते, अभिमन्यू कुशवाह, कृष्ण कोरडे, यशोवर्धन सोळंके, पंकज गवळे, मनोज चव्हाण, रविराज सुतार, अरमान निजाम अली,
सार्थक माकोडे, रोहित कांबळे, नवनीत पनीकर, अब्राहम खासदार, गोविंद पाडेकर, कुलदीप पाटील, महादेव कोळेकर, रुतीककुमार  वर्मा, चैतन्य कवरे.

मुलींचा संघ : पूजा राठोड, आदिती सरवदे, पल्लवी डोंगरवार, गायत्री निंदेकर, सुकन्या शिवने, आदिती खोत, मानसी यादव, प्रणाली मंडले, साक्षी भंडारी, नेहाली बोरवाले, साक्षी थाटकर, श्रुतिका मोरे, वैभवी भोईटे, केया खैरनार, सिद्धी दानवे, समृद्धी बाबर, अमृता कटके, गाथा कबीर, योगिनी कोकरे, प्रांजली साळुंखे, ईश्वरी धंगेकर, गीता राठोड, प्रियांजली सिंग, सिद्धी पाटील, प्राची पाटील, वनिता पुंगाटी, सानिका कदम, डॅफनी नादार, कनुष परब, खुशी तायडे, अंशू शर्मा, मेघना मोहिते, ममता पाटील, संतोषी नरळे, स्वाती कल्लोडे, मयुरी कुपाटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *