
पुणे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : पुणे क्रीडा उपसंचालक कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतर शालेय स्क्वॉश स्पर्धेला शनिवारी उंड्री येथे शानदार प्रारंभ झाला.
उंड्री येथील महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटनेच्या स्क्वॉश अकादमीत ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून ८० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, माजी क्रीडा उपसंचालक विजय संतान, क्रीडा अधिकारी वैशाली दराडे, शिवाजी कोहली यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत पंच म्हणून सतीश पोद्दार, नितेश पोतदार, रोहिदास गाडेकर, क्रिश कलकुट्टी, गोविंद सिंग हे काम पाहात आहेत.