
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल संघटनेचा सोलापूरचा खेळाडू स्वप्नील सुनील भोसले व सीताराम काशिनाथ भांड यांनी पंजाब येथे झालेल्या ३७व्या सीनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र बेसबॉल संघास सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण कामगिरीबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे व बेसबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सीए विनोद भोसले उपस्थित होते. या दोघाना प्रा. संतोष खेंडे, प्रशांत कदम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर, सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. संतोष गवळी, मारुती घोडके, प्रा. नागनाथ नवगिरे, राजाराम शितोळे यांनी अभिनंदन केले आहे.