राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत पानगल प्रशाला संघ तृतीय

  • By admin
  • January 5, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

सोलापूर : कन्याकुमारी येथे झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेमध्ये एम. ए. पानगल अँगल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाने १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय स्थान मिळविले.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक म. अली शेख, नावेद मुंशी, अल्ताफ सिद्दिकी व इक्बाल दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. हारुन रशीद बागवान, उपमुख्याध्यापिका सुरय्या परवीन जहागीरदार,  निकहत नल्लामंदू आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात साकीब सौदागर, अब्दुल्ला पटेल व कोतकुंडे अफवान यांनी तर १९ वर्षांखालील गटात बागवान अयान, जैन हन्नुरे, मुजमील पटेल यांनी चमकदार कामगिरी बजावली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *