
नागपूर : काटोल रोड येथील गजानन सभागृहात नुकत्याच झालेल्या आंतर शालेय कराटे स्पर्धेत लीव्हरेज ग्रीन कराटे अकादमी (कोराडी) खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत १५ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे जागतिक फुनाकोशी कराटे संघटनेचे अध्यक्ष हंसी हसन इस्माईल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्पर्धेचे आयोजक राहुल, रतन समुद्रे, जावेद शेख, किरण यादव उपस्थित होते. या स्पर्धेत लीव्हरेज ग्रीन कराटे अकादमी खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत दोन सुवर्ण, आठ रौप्य आणि पाच कांस्य अशी १५ पदके पटाकवली.
या स्पर्धेत वंशिका डहाके (१ सुवर्ण, १ रौप्य), जानकानुरू वर्मा (१ सुवर्ण, १ रौप्य), हिमांश वानखेडे (१ रौप्य, १ कांस्य), ध्रुव रंगारी (२ रौप्य), सर्वोत्कृष्ट मेश्राम (१ रौप्य, १ कांस्य), नियती असोले (१ कांस्य), वरण्यम कलाल (१ कांस्य) व काशवी पाल (१ कांस्य) या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावत १५ पदकांची कमाई केली. सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक सुमित नागदवने, ज्ञानश्री डोंगरे यांनी अभिनंदन केले.