
केपटाऊन : पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझम याला त्याच्या खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. पण बाबर आता पुन्हा लयीत आला आहे. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात बाबरने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे बाबरच्या नावाने एक चमत्कार घडला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार अर्धशतके झळकावली आहेत. केपटाऊनमध्ये बाबरने ५८ धावांची इनिंग खेळली आहे.
बाबर आझम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेत सपशेल फ्लॉप झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो विशेष काही करू शकला नाही. पण आता बाबर पुन्हा लयीत आला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार अर्धशतके झळकावली आहेत. बाबरने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात १२७ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ७ अर्धशतकेही झळकावली आहेत. बाबरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतही अप्रतिम कामगिरी केली.
चार अर्धशतके
बाबरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन एकदिवसीय सामन्यात ७३ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर जोहान्सबर्गमध्येही त्याने ५२ धावांची इनिंग खेळली. हा देखील एकदिवसीय सामना होता. सेंच्युरियन कसोटीत बाबरने अर्धशतक झळकावले होते. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ५० धावा केल्या. तर पहिल्या डावात तो ४ धावा करून बाद झाला होता. यानंतर केपटाऊनमध्ये त्याने ५८ धावांची खेळी केली.
बाबरची आतापर्यंतची कारकीर्द
बाबरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रभावी ठरली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५६ कसोटी सामन्यांमध्ये ४०५१ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ९ शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. बाबरने १२३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत ५९५७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १९ शतके आणि ३४ अर्धशतके केली आहेत. त्याने पाकिस्तानसाठी १२८ टी २० सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये ४२२३ धावा झाल्या आहेत.