
नवी दिल्ली : भारतीय संघाला कसोटी जिंकायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
सिडनी कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ३-१ असा विजय मिळवला. त्याचवेळी भारतीय संघ तब्बल १० वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हरला. भारतीय संघाच्या पराभवावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी जिंकायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल, असे सौरव गांगुलीचे मत आहे, मात्र या मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज सतत फ्लॉप होत राहिले.
सौरव गांगुली म्हणाला की, ‘आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, आम्हाला कसोटी फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही कसोटी सामन्यात चांगली फलंदाजी केली नाही तर तुम्ही कसोटी जिंकू शकत नाही. १७०-१८० धावा करून तुम्ही कसोटी जिंकू शकत नाही. तुम्हाला कसोटी सामन्यांमध्ये ३५०-४०० धावा कराव्या लागतील. माजी भारतीय कर्णधार म्हणाला की, ‘तुम्ही वैयक्तिकरित्या कोणालाही दोष देऊ शकत नाही, परंतु या मालिकेत मधल्या फळीने निराश केले. इथे प्रत्येकाला हातभार लावायचा होता, पण आमचा संघ तो करू शकला नाही. त्यामुळे आम्ही कसोटी मालिका गमावली.’
कोहली आणि रोहितचा फॉर्म
याशिवाय सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या अलीकडच्या फॉर्मवर आश्चर्य व्यक्त केले. गांगुली म्हणाला की मला समजले नाही, पण विराट कोहली महान खेळाडू आहे यात शंका नाही. मला खात्री आहे की विराट कोहली त्याच्या अडचणींवर लवकरच मात करेल. तसेच सौरव गांगुलीने रोहित शर्मा सिडनी कसोटीत न खेळल्या बद्दल आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, सिडनी कसोटीत न खेळणे हा रोहित शर्माचा वैयक्तिक निर्णय होता. काय करावे लागेल हे त्याला चांगले माहीत आहे.’