राज्य अॅक्वाथलॉन, ट्रायथलॉन स्पर्धेत रायन, संविधान, अभिमानसिंहची चमकदार कामगिरी 

  • By admin
  • January 6, 2025
  • 0
  • 86 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन आणि अॅक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रायन लोहाडे, अभिमानसिंह पाटील आणि संविधान गाडे यांनी शानदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली.

महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन व जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते. राज्यस्तरीय अॅक्वाथलॉन व ट्रायथलॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर ट्रायथलॉन असोसिएशनच्या खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी केली. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, वर्धा, कोल्हापूर, सातारा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातून खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रायन लोहाडे याने अंडर १२ मुलांच्या गटात अॅक्वाथलॉन प्रकारात रौप्य पदक मिळविले. तर पॅरा कॅटेगिरीमध्ये अभिमानसिंह पाटील याने सुवर्ण पदक पटकावले. संविधान गाडे याने कांस्य पदक मिळविले. तसेच अहमद यार खान, शिरीष यादव, विराज बासनीवाल, रुद्रा वाघचौरे, आदित्य पटारे, कविता जाधव, मीत मापारी, मोहम्मद यार खान, इब्राहिम यार खान, स्पर्श कामेकर, अफान यार खान, आर्यवीर राऊत, रुद्राक्ष लोंढे, अजिंक्य लाळे या खेळाडूंनी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

या खेळाडूंना ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक अभय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संघासोबत चरणजित सिंग संघा, निखिल पवार, अजय दाभाडे व अजयसिंग पाल यांनी संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. पदक विजेत्या खेळाडूंना व संघास छत्रपती संभाजीनगर जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे, उपाध्यक्ष अशोक काळे, संदीप चव्हाण, सचेंद्र शुक्ला, डॉ. सुनील देशमुख, डॉ. प्रफुल्ल जटाळे, डॉ. संदीप जगताप, प्रदीप बुरांडे, माधव गौंड आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *