
नागपूर (सतीश भालेराव) : आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत आशुतोष बावणे याने १ मिनिट ५२ सेकंद आणि १६ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चाच विक्रम मोडून काढला.
नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत आशुतोष बावणे याने हा नवा विक्रम नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण पाच हिट झाल्या. अंतिम फेरीत एकूण १६ ॲथलिट होते. यामध्ये एसबीसीटी कॉलेजच्या आशुतोषने हा पराक्रम नोंदवत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
आशुतोष बावणे या नागपूर विद्यापीठाच्या रवीनगरच्या विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर नियमित सराव करीत असतो. त्याला प्रशिक्षक नरेश शेळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच नवी विक्रम नोंदविल्याबद्दल नागपूर विद्यापीठातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. विशाखा जोशी व प्रशिक्षक यांनी आशुतोषचे अभिनंदन केले आहे.