राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत महाराष्ट्र संघास विजेतेपद 

  • By admin
  • January 6, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : जयपूर येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. उत्तर प्रदेश संघ उपविजेता ठरला तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. 

भवानी निकेतन कॉलेज इनडोअर स्टेडियम, सीकर रोड (जयपूर) येथे राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वजन गटात सुमारे २२ राज्यांतील ४८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम, उत्तर प्रदेशला द्वितीय तर राजस्थानला तृतीय क्रमांक मिळाला. 

 समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते जितेंद्रसिंग जादौन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विशेष अतिथी म्हणून प्रताप भानुसिंग शेखावत हे उपस्थित होते. खेळाडूंना संबोधित करताना चित्रपट अभिनेते जादौन म्हणाले की, ‘खेळ हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट टॉनिक आहे.  मुलांच्या आरोग्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा मुल खूप लहान असते, तेव्हा तो खाटेवर पडून आपले हात पाय हलवत राहतो. त्यामुळे त्याचा व्यायाम होतो आणि त्याचे दूध पचते. खेळ खेळून तो स्वतःला निरोगी ठेवतो. खेळ आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक बळ देते.’

महाराष्ट्रातील खेळाडूला महाराष्ट्र अध्यक्ष शंकर महाबळे व भाग्यश्री महाबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्राच्या वतीने पंच म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश गीते, महेश मोरे, किरण कुलधर, तेजस राठोड, शालिनी महाजन, श्रीनय 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *