
छत्रपती संभाजीनगर : चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या शुभम पोले व सार्थक दौंगे या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा ९ ते १३ जानेवारी या कालावधीत आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगाव, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या १४ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शुभम पोले व सार्थक दौंगे यांची महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात निवड करण्यात आली. दोन्ही खेळाडू हे राजश्री शाहू विद्यालय, रांजणगाव शे. पु. येथे शिक्षण घेतात. प्रमोद गुंड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.
१४ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शुभम पोले व सार्थक दौंगे यांची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सवई, संचालक विकास सवई, मुख्याध्यापक अशोक चेदे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, श्रीपाद लोहकरे, विनायक राऊत, आशिष कान्हेड, मनोज गायकवाड मार्गदर्शक प्रमोद गुंड, आकाश खोजे, उमेश साबळे यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.