
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे महाराष्ट्रर राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, आदिवासी विकास मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रवीण आव्हाळे, राज्य कार्याध्यक्ष हनुमान भोंडवे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. संजय पाटील, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील मगर पाटील, जिल्हा सचिव प्रा. अक्षय न्यायाधीश व सदस्य ॲड. ऋषिकेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.