
नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथे झालेल्या सीनियर राष्ट्रीय ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू श्रद्धा चोपडे हिने सुवर्णपदक पटकावत आपला दबदबा कायम ठेवला.
राष्ट्रीय सीनियर ज्युदो स्पर्धा गाजवणारी सुवर्णपदक विजेती श्रद्धा चोपडे ही सध्या भोपाळ येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. जिल्हा ज्युदो संघटनेच्या बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या परमेश्वरी देवानी ज्युदो क्लबची श्रद्धा चोपडे ही खेळाडू आहे.
तिसगावच्या श्रद्धा कडूबाळ चोपडे हिने सीनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत ५२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे श्रद्धाची नॅशनल गेम्स ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रद्धा हिने या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहेत.
श्रद्धा चोपडे हिला अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोळंकी, मधुश्री देसाई, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, शैलेश कावळे, कडूबाळ चोपडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
या सुवर्ण कामगिरीबद्दल साई क्रीडा केंद्राचे सीनियर प्रशिक्षक योगेश धाडवे, महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे सचिव शैलेश टिळक, तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे, सतीश पहाडे, मधुश्री देसाई, गणेश शेटकर, विजय धीमन, जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामनोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, मनिंदर बिलवाल, सुनील सिरसवाल, अमित साकला व बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदमुरी श्रीनिवास, मनोहर देवानी, नामदेव दौड, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, अभिजीत दळवी, विकास देसाई, शैलेश कावळे, सुधीर काटकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.