बुद्धिबळ स्पर्धेत कविश भट्टड,हियान रेड्डी, रिजुल कुराडे यांना विजेतेपद

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 61 Views
Spread the love

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या आयोजित पीडीसीसी ७, ९, ११ वर्षांखालील मुले व मुली निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत कविश भट्टड, हियान रेड्डी, रिजुल कुराडे यांनी चमकदार कामगिरी बजावत विजेतेपद संपादन केले.

या स्पर्धेत आठव्या फेरीत ७ वर्षांखालील खुल्या गटात कविश भट्टड याने विराज कदमचा पराभव करून ८ गुणांसह विजेतेपद पटकावले. दुसऱ्या पटावरील लढतीत रियांश पितळेने सन्मित जोशीचा पराभव करून ६.५ गुणांसह दुसरा, तर सक्षम साहाने नीव शहाला पराभूत करून ६ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

९ वर्षांखालील गटात पहिल्या पटावर हियान रेड्डीने आयुश जगतापला बरोबरीत रोखले व ७.५ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. निवान अगरवाल याने ६.५ गुणांसह दुसरा आणि मंतीक अय्यरने ६.५ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

११ वर्षांखालील खुल्या गटात रिजुल कुराडेने राघव पावडेचा पराभव करून ७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. याच गटात ईशान पीवायने रोनक कोरेचा पराभव करून ६.५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. केविन माथीयाझगनने अर्जुन कौलगुडवर विजय मिळवत ६.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर, पीडीसीसीचे सदस्य संजय आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर अथर्व गोडबोले, डेप्युटी चीफ आर्बिटर श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *