छत्रपती संभाजीनगर संघाचा १८ धावांनी विजय 

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

सलमान अहमद, ऋषिकेश नायरची लक्षवेधक कामगिरी 

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महा टी २० क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने स्टार क्रिकेट क्लब संघाचा चुरशीच्या सामन्यात १८ धावांनी पराभव केला.

पाटील क्रिकेट स्टेडियम (रामपूर) या ठिकाणी हा सामना झाला. या सामन्यात निशांत नगरकर (४९), सलमान अहमद (४४), ऋषिकेश नायर (४०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. निशांत याने २३ चेंडूत ४९ धावांची वादळी खेळी करताना तब्बल ७ षटकार ठोकले. सलमान याने दोन षटकार व तीन चौकारांसह ४४ धावांचे योगदान दिले. ऋषिकेश नायरने १५ चेंडूत ३ चौकार व चार षटकार ठोकले. गोलंदाजीत सलमान अहमदने ११ धावांत तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. ऋषिकेश नायरने १२ धावांत दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : छत्रपती संभाजीनगर : २० षटकात पाच बाद १६० (सलमान अहमद ४४, सागर पवार ३२, आनंद ठेंगे नाबाद २४, ऋषिकेश नायर ४०, अमेय देशमुख १-१५, निशांत नगरकर १-२२, हिमांशु अग्रवाल १-१६) विजयी विरुद्ध स्टार क्रिकेट क्लब : २० षटकात सात बाद १४२ (निशांत नगरकर नाबाद ४९, प्रतीक पोखर्णीकर २०, सौरभ दरेकर ३१, सलमान अहमद ३-११, ऋषिकेश नायर १-१२, शुभम मोहिते १-१६). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *