
विश्वचषक खो-खो स्पर्धा
नवी दिल्ली : महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होत आहे. या विश्वचषक स्पर्धेत २४ देशातील संघ सभागी होणार आहेत. भारतीय संघाचे सराव शिबीर दिल्ली येथे सुरू आहे. या शिबिरातून भारतीय खो-खो संघ निवडला जाणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनाचे माजी सचिव, भारतीय खो-खो महासंघाचे कार्यकारी सदस्य असलेले छत्रपती संभाजीनगरचे नोटरी ॲड गोविंद शर्मा यांनी याआधीही अनेक पदांवर यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. त्यांनी २०१६ पासून भारतीय खो-खो महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य, खेलो इंडिया, महाराष्ट्र राज्य शालेय, नॅशनल गेम्स, निवड समिती सदस्य, नेपाळ विरूद्ध झालेल्या खो-खो कसोटीत त्यांनी भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षकपद, २०१६ मधील इंदूर व २०२३ आसाम येथील आशियाई खो-खो स्पर्धेत तांत्रिक अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटनेचा पुरस्कार इतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध पदांवर यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची ही नियुक्ती झाली आहे.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव तथा महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव डॉ चंद्रजित जाधव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन कार्याध्यक्ष बालाजी सागर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, रमेश भंडारी, सारिका भंडारी, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, आशिष कानडे, विनायक राऊत आदींनी गोविंद शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.