
युवा कराटे ट्रेनिंग सेंटरतर्फे युवा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
पुणे : ‘खेळ हा माझा श्वास आहे. तसेच खरे संस्कार आई व वडील मुलांना देवू शकतात आणि हिच मोठी पदवी आहे असे प्रतिपादन रुस्तम ए हिंद महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू अमोल बुचडे याने केले.
युवा आधार संस्थेच्या युवा कराटे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ब्लॅक बेल्ट पदवी व युवा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा विकास नगर किवळे या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
युवा ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्याम भोसले, सचिव विशाल तरस, प्रशिक्षक अँथोनी लक्कीपोगी, सलीम शेख, योगेश खंडागळे, आदित्य बारणे, ज्ञानेश्वरी गवळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या सोहळ्यात रुस्तमै हिंद महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान तसेच युवा पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक शंकर विठ्ठल जम यांना आणि पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे यांना युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना खेळ माझा श्वास आहे तसेच खरे संस्कार आई व वडील मुलांना देवू शकतात आणि हिच मोठी पदवी आहे असे खेळाडू व पालकांना संबोधित करताना मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष अखिल भारतीय कुस्तीगीर संघ पैलवान हरीश कदम, प्रभारी मुख्याध्यापक पिंपरी चिंचवड मनपा शाळा विकासनगर बाळासाहेब ढगे, सामाजिक कार्यकर्ते विकास नगर रामचंद्र तरस हे उपस्थित होते.
या ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान सोहळ्यात श्रीजा राजगोपाल अचार्या, समीक्षा कुंदन कसबे, वैष्णवी वसंत कनक, श्रेया शंकर सरोदे, गायत्री गणेश सावंत, आश्लेषा अखिलेश गाडे, भाग्यलक्ष्मी सुरेश अटेल, अपेक्षा सुनील गुजर, सृष्टी संतोष कणबरकर, रिया आशिष गोरे, सांची सुहास पवार, नेहा विनोद बोरकर, साक्षी विनोद बोरकर ,सिद्धी पोपत येवले, माहीन पीरमहंमद पठाण, या मुलींना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली. ज्ञानेश्वरी बाळू गवळी यांना
ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन ही पदवी देण्यात आली.
ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान सोहळ्यात जतीन पद्माकर चोथे, मानव राज सिंह, हरेन्द्र चौधरी, अथर्व अनिल कुंभार, सानिध्य रुपेश ओव्हाळ, निशांत सुभाष ओव्हाळ, सुदेश हनुमंत लालगुडे, अरविंद राजपांडीयन त्रिमूर्ती, तीर्थ पुष्कर कुरकुरे, सुशांत सुभाष ओव्हाळ, महीन जय शेट्टी, राजवर्धन राहुल शिंदे, या मुलांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली. योगेश नितीन खंडागळे ब्लॅक बेल्ट सेकंद डॅन ही पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले तर पियुषा सुर्यवंशी यांनी आभार मानले.