
भुसावळचा अर्जुन सनस कर्णधार, जळगावचा फिरोज तडवी उपकर्णधार
जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने लातूर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित खुल्या गटातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा फुटबॉल संघ घोषित करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी संघ घोषित केला आहे.
मागील १५ दिवसांपासून उज्वल काळे, थॉमस डिसोजा व मनोज सुरवाडे या निवड समितीने हा संघ निवडला आहे. संघाला शुभेच्छा देण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, प्रशासकीय अधिकारी हिमाली बोरोले, सचिव फारुक शेख, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद, इव्हेंट प्रमुख वसीम शेख यांची उपस्थिती होती
जळगाव फुटबॉल संघ
निखिल पाटील व उत्कर्ष देशमुख (दोन्ही गोलकीपर), अर्पित वानखेडे, तौसिफ खान, दानिश खान, पंकज पाटील, कुणाल माळी, फिरोज तडवी, जकी शेख व रोशन पाटील (सर्व जळगाव), अर्जुन सनस, बॉबी शिंगाटे, पीटर डिसोजा, आकाश परदेशी, सादिक अली, प्रज्वल कळमसरे, अर्पित रंधवा, पुष्पक तायडे, कादिर तडवी, सालबा शेख व अरविंद चिल्लरवार (सर्व भुसावळ), विनय बाविस्कर (वरणगाव).
संघ प्रशिक्षक : उज्वल काळे (भुसावळ), संघ व्यवस्थापक : वसीम शेख (जळगाव).
राखीव खेळाडू : शर्जील खान, खुशाल पवार, डेनिस चार्ल्स.