युझवेंद्र चहलच्या आयुष्यात वादळ 

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 69 Views
Spread the love

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यात एक वादळ निर्माण झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये त्याने नृत्यांगना आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माशी लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार चहल आणि धनश्रीमध्ये सर्व काही ठीक असल्याचे दिसून येत नाही. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल माध्यमातून होत आहे. 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे आणि भारतीय क्रिकेटरने त्याचे आणि धनश्रीचे सर्व फोटो हटवले आहेत. वास्तविक, भारतीय लेग स्पिन बॉलर याआधी आणखी एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बॉलीवूड शादी डॉट कॉमनुसार धनश्रीला डेट करण्याआधी काही वर्षे युजवेंद्र चहल तनिष्का कपूर नावाच्या एका बिझनेसवुमनला डेट करत होता. जेव्हा ते एकत्र हँगआऊट करताना दिसले तेव्हापासून त्यांच्या एकत्र येण्याची अटकळ सुरू झाली. चहलही तनिष्काच्या सोशल मीडिया पोस्टवर नियमितपणे कमेंट आणि लाईक करत होता. मात्र काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले.

काही वर्षांपूर्वी टीओआयला दिलेल्या मुलाखतीत युजवेंद्र चहलने तनिष्का सोबतच्या नात्याच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तो म्हणाला, ‘गेल्या ४-५ महिन्यांपासून मी तनिष्का आणि माझ्या नात्याबद्दल बातम्या वाचतोय. मी अनेक लेख वाचले आहेत पण सत्य हे आहे की तनिष्का आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्यांना वाटते की आम्ही डेटिंग करत आहोत.

दुसरीकडे, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा डिसेंबर २०२० मध्ये विवाहबद्ध झाले. पण त्यांच्या विभक्त होण्याची अफवा २०२२ मध्ये पहिल्यांदा आली जेव्हा धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आडनाव काढून टाकले. मात्र नंतर चहलने वेगळे होण्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *