
जुन्नर (ऋषिकेश वालझाडे) : नाशिक येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे शहर संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील सचिव, संघ प्रशिक्षक तसेच संघ व्यवस्थापक उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते.
पुणे शहर संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या पुणे संघात कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येथील खेळाडू रुद्र कोळेकर हा सहभागी झाला होता. त्याने उत्कृष्ट कामगिरी करत मॅन ऑफ दि मॅच पुरस्कार संपादन केला. पुणे शहर संघास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. पुणे शहर संघाचे प्रशिक्षक व सचिव ज्ञानेश्वर जाधव हे आहेत. या यशाबद्दल प्राचार्या, सचिव, क्रीडा शिक्षक यांनी संघाचे अभिनंदन केले.