
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता नववीत शिकणारी आरोही उमेश देशपांडे हिने चमकदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत आरोही देशपांडे हिने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५४२ गुणांची कमाई करीत ज्युनिअर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी करीता पात्रता मिळवली आहे. अतिशय कमी वयात मोठी कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. आरोहीला आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमेध कुमार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ती छत्रपती संभाजीनगरात फायर आर्म शुटिंग रेंजवर सराव करते.