
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष बुद्धिबळ संघ जाहीर करण्यात आला आहे.
आइ ई एस विद्यापीठ भोपाळ येथे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष बुद्धिबळ संघात खेळाडू निखिल चौतमल, मौर्य मरडवार, आदित्य घुले, कार्तिक डोंगरे, ओम नागरे व अभिजीत गवळी यांचा समावेश आहे. संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून डाॅ विनय हातोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या खेळाडूंना कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीत सिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.