राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची आगेकूच 

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 66 Views
Spread the love

जळगाव :  जळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल अंडर १७ मुले-मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होत आहे.

या स्पर्धेत मुलांच्या झालेल्या सामन्यामध्ये मध्य प्रदेशने राजस्थानचा   १-० ने, ओडिसा संघाने सीबीएससीचा १४-० ने, छत्तीसगडने तामिळनाडूचा १०-० ने सहज पराभव केला. आंध्र प्रदेश संघाने चंडीगड संघाचा ३-० ने, तेलंगणाने राजस्थानचा १४-४ ने, गोवाने सीबीएससी संघाचा १०-० ने, छत्तीसगड संघाने पुडुचेरी संघाचा ८-० ने, चंडीगडने विद्याभारतीचा ७-० ने, राजस्थानने हरियाणाचा १-० ने, पंजाबने सीबीएससीचा १०-४ ने पराभव केला. राजस्थानने बिहार संघाचा ६-० ने, गुजरातने सीबीएससीचा १०-० ने, छत्तीसगड संघाने मणिपूरचा ८-० ने तर मध्य प्रदेशने तेलंगणाचा ७-० ने पराभव करुन आगेकूच केली.

मुलींच्या गटात झालेल्या सामन्यांमध्ये राज्यस्थानने जम्मू काश्मिरचा ११-० ने, महाराष्ट्र संघाने छत्तीसगढचा ३-० ने, पंजाब संघाने चंदीगडचा १०-१ ने, दिल्ली संघाने विद्या भारतीचा ५-०ने पराभव केला. ओडिशा संघाने आंध्र प्रदेशचा ११-२, मध्य प्रदेशने तामिळनाडूचा ३-१ ने, राज्यस्थानने मणिपूरचा १०-० ने, छत्तीसगढने बिहारचा १०-० ने पराभव केला. पंजाब संघाने सीबीएस संघाचा १०-० ने, दिल्ली संघाने हरियाणाचा ६-४ ने, आंध्र प्रदेशने गोवा संघाचा १२-० ने, तेलंगणाने तामिळनाडूचा १०-० ने, जम्मू काश्मिर संघाने मणिपूर संघाचा १०-३ फरकाने पराभव करत आगेकूच केली. महाराष्ट्र संघाने बिहार संघाचा ५-० ने, चंदीगड संघाने सीबीएस संघाचा १०-० ने, गुजरात संघाने तामिळनाडुचा ९-२ ने पराभव केला. 

महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने आपल्या सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी  विजय संपादन करुन आपली चुणूक दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *