
नाशिक : विभागीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेली विभागीय रस्सीखेच स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे झाली १९ वर्षांखालील पुरुष रस्सीखेच स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, धुळे शहर, धुळे ग्रामीण, नंदुरबार शहर, नंदुरबार ग्रामीण असे बलाढ्य संघ सहभागी झाले होते. हिरे महाविद्यालय संघाच्या वतीने कर्णधार शिवम विश्वकर्मा, ऋषिकेश शिंदे आदींनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
या घवघवीत यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ संपदा हिरे, विश्वस्त डॉ अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या उपाध्यक्षा डॉ योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्य, डॉ सुचिता सोनवणे पर्यवेक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.