
छत्रपती संभाजीनगरच्या ४६ खेळाडूंची निवड
छत्रपती संभाजीनगर : जम्मू येथे होणाऱ्या १९व्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र संघात छत्रपती संभाजीनगरच्या ४६ खेळाडूंचा समावेश आहे.
जम्मू येथे १० ते १३ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू जिम्नॅस्टिक्स असोसिएशनतर्फे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील ४६ खेळाडूंची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला आहे. या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून धैर्यशील देशमुख व पंच म्हणून सिद्धार्थ कदम, डॉ निलेश जोशी व ईशा महाजन तसेच संघ व्यवस्थापक म्हणून दीपाली बजाज यांची निवड झाली आहे.
या संघाला महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, सचिव डॉ मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग केंद्राच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, रोहित रोंघे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी डे, तनुजा गाढवे यांनी प्रशिक्षक व खेळाडूंना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र टीम
नॅशनल डेव्हलपमेंट टीम : सूर्या सौंदाळे, स्वराज गट्टूवार, रिद्धी मेहता, प्रणित बोडके.
१२ ते १४ वयोगट : अवंतिका सानप, अद्वैत काचेवार, रिया नाफडे, आर्यन फुले, अक्षया कलंत्री, सान्वी सौंदाळे, पुष्टी अजमेरा, श्वेता राऊत, ओम सोनी, ईशिका बजाज, रिधिमा आव्हाड.
१५ ते १७ वयोगट : अनिकेत चौधरी, गौरी ब्रह्मणे, दीपक अर्जुन, विश्वेश पाठक, पार्थेॉश मार्गपवार, सुहानी तायल, अनुष्का राखेवार, निर्णय मुसरीफ, विश्वेश जोशी, अनुराग देशमुख, मुग्ध भावसार, राधा सोनी, अनुश्री गायकवाड.
१८ वयोगटावरील खेळाडू : आर्या शाह, मानसी देशमुख, उदय मधेकर, श्रीपाद हराळ, स्मित शाह, रामदेव बिराजदार, तनिष्क राजेगावकर, अद्वैत वझे, अभय उंटवाल, संदेश चिंतलवाड, सायली वझरकर, साक्षी लड्डा, साक्षी डोंगरे, पाणिनी देव, प्रेम बनकर, अदिती तळेगावकर.