
छत्रपती संभाजीनगर : चंदीगड येथे पंजाब विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघात अजंठा नेमबाजी केंद्राच्या दहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा रायफल संघटना संलग्नित अजंठा नेमबाजी केंद्राच्या १० खेळाडूंची विद्यापीठ नेमबाजी संघात निवड झाली आहे. त्यात रोहन जाधव, शुभम गुरुनानी, वेदांत जाधव, मिहीर बागडे, प्रीती राठोड, कृपा पटेल, कृष्णाली राजपूत, अंजली वाघमोडे, जयसिंग राजपूत आणि हर्षवर्धन सिरसाठ या खेळाडूंचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना अजंठा रायफल व पिस्तूल शूटिंग क्लबचे मुख्य प्रशिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष व पोलिस आयुक्त प्रवीण पवार, संघटनेचे अनंत बर्वे, उमेश पटवर्धन, मनीष धूत, हेमंत मोरे, जगतसिंग राजपूत आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.