
छत्रपती संभाजीनगर : आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत बीड जिल्हा संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यपीठ कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या चार जिल्ह्याच्या संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा साखळी पद्धतीने घेण्यात आली. बीड जिल्ह्याच्या संघाने साखळी पद्धतीचा प्रत्येक सामना जिंकत ६ अंक मिळवत विजेतेपद मिळविले तर छत्रपती संभाजीनगर संघाला ४ अंक मिळवून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ सुहास यादव, डॉ गंगावणे, डॉ प्रशांत तोर, डॉ वनगुजरे, प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ मंगेश डोंगरे, अनिल बागुल, अक्षय दाने, मुर्तुझा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे, अकबर शेख आदींनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेमध्ये पंच म्हणून सुनील गायसमुद्रे, कपिल शेळके, प्रमोद उघडे, डॉ योगेश निकम, महेंद्र गायकवाड आदींनी काम पाहिले.