
राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकावला तृतीय क्रमांक
छत्रपती संभाजीनगर : छतीसगड येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र बेसबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. गायकवाड ग्लोबल स्कूलचा सचिन नाबदे याने महाराष्ट्र संघाकडून खेळताना उत्कृष्ट योगदान दिले.
सचिन नाबदे हा गायकवाड ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता सहावीतील विद्यार्थी आहे. मुख्याध्यापिका डॉ सुलेखा ढगे यांनी सचिनचे अभिनंदन करताना सांगितले की, ‘सचिनने मिळवलेले यश गायकवाड ग्लोबल स्कूलसाठी अभिमानास्पद क्षण आहे. त्याचे खेळाप्रती असलेले समर्पण, त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह, त्याच्या समवयस्कांसाठी प्रेरणा आहे. सर्वांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे विद्यार्थी आणि त्यांना विविध क्षेत्रात चमकण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.’
सचिन नाबदे याला शाळेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणव तारे यांच्यासह क्रीडा शिक्षक योगेश जाधव, अमृता शेळके आणि जितेंद्र चौधरी यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास गायकवाड, संस्थापक संचालक कालिंदा गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक कुलभूषण गायकवाड व कार्यकारी संचालक नंदकुमार दंदाले यांनी सचिन नाबदे याचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.