
रांची येथे ११ जानेवारीपासून राष्ट्रीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : रांची येथे ११ ते १४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय अंडर १४ मुले-मुली अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ स्पर्धेसाठी रांचीला रवाना झाला आहे.
या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आले. महाराष्ट्र संघासमवेत संघ व्यवस्थापक म्हणून खंडू यादवराव, क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, पूनम नवगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघ
मुलांचा संघ : ध्रुव शिरोडकर, सिद्धेश क्षीरसागर, रॉयडेन कोळी, अजय बारेला, आदिला राठोड, तनिष्क जोंधळे, पृथ्वीराज चव्हाण, शौर्य साकोरे, अवधूत वाघमळे, आरुष चव्हाण, यश गोसावी, पार्थ नार्वेकर, पियुष साळुंखे, सय्यद सलीम, देवाज पारेख, ईशान सुरवसे, आदित्य कुमार सिंह, सलमान.
मुलींचा संघ : भार्गवी देशमुख, रिसा फर्नांडिस, कस्तुरी चव्हाण, अनन्या मगर, जान्हवी निकम, माधवी यादव, रावी रोकडे, जीविका सोनेग्रा, जोशिका सेरॅकम, जयनी पाटील, चिनू कांबळे, द्रीशिका बांगर, सई घाडगे, गुंजन चांडक, वैष्णवी कदम.