
वडोदरा : एका षटकात ६ चौकार किंवा ६ षटकार मारता येतात. पण, एका षटकात ७ चौकार किंवा ७ षटकार मारणे ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’ वाटते. तथापि, अनेक प्रसंगी एका षटकात ७ चौकार मारले गेले आहेत. भारतात सध्या खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय स्पर्धेत भारतीय फलंदाज नारायण जगदीश याने एकाच षटकात सात चौकार ठोकून एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.
विजय हजारे ट्रॉफीचा दुसरा क्वार्टर फायनल राजस्थान आणि तामिळनाडू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने एका षटकात ६ चौकार मारून चमत्कार केला, परंतु त्या षटकात ७ चौकारांच्या मदतीने एकूण २९ धावा झाल्या.
या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकात धावांचा पाठलाग करताना, एका षटकात ७ चौकार मारण्याचा पराक्रम घडला. तामिळनाडू फलंदाजी करत असताना राजस्थानच्या अमन सिंग शेखावतने दुसरा षटक टाकताना पहिला चेंडू वाईड टाकला. त्यामुळे चौकार लागला. अशाप्रकारे, षटक सुरू होण्यापूर्वीच ५ धावा झाल्या. त्यानंतर नारायण जगदीशनने षटकातील ६ चेंडूत ६ चौकार मारत २४ धावा केल्या. अशाप्रकारे, षटकात ७ चौकारांच्या मदतीने एकूण २९ धावा झाल्या.
राजस्थानचा संघ २६७ धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी केली आणि ४७.३ षटकांत सर्वबाद २६७ धावा केल्या. यादरम्यान, संघाकडून सलामीला आलेल्या अभिजीत तोमरने सर्वात मोठी खेळी खेळली आणि १२५ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १११ धावा केल्या. याशिवाय कर्णधार लोमरोरने ४९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या.