
नंदुरबार : नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सतर्फे सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स मे-जून २०२४ बंगळुरू येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदुरबार येथील कुणाल भाट हे उत्तीर्ण झाले आहेत.
कुणाल भाट हे जिल्हा हॉकी संघटनेचे पहिले प्रशिक्षक आहेत. कुणाल भाट हे सध्या भालेर येथील शासकीय आश्रमशाळा येथे क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या मार्गदर्शनात अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय खेळाडू घडले आहेत.
कुणाल भाट यांना नंदुरबार जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव व एस ए मिशन हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक खुशाल शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.