
अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धा
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने आसाम संघाचा ४६ धावांनी पराभव करत आगेकूच कायम ठेवली.
सुरत येथे हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४४.१ षटकात सर्वबाद १३९ धावसंख्या उभारली. मयुरी थोरात हिने ३४ धावा काढल्या. तिने तीन चौकार मारले. गायत्री सुरवसे (२०), श्रद्धा गिरमे (१४), साक्षी शिंदे (१८), सह्यद्री कदम (१०), आचल अग्रवाल (९) यांनी आपापले योगदान दिले. आसाम संघाकडून रुपशिका हिने २० धावांत चार विकेट घेतल्या. आकांक्षा शांडिल्य हिने २७ धावांत दोन बळी मिळवले.
आसाम संघ ३१.४ षटकात ९३ धावांत सर्वबाद झाला. खुशी कुमारी हिने सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाकडून जान्हवी वीरकर (२-१५), गायत्री सुरवसे (२-१८), आचल अग्रवाल (२-२१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. निकिता सिंग हिने ९ धावांत एक बळी घेतला.