
छत्रपती संभाजीनगर : कोटा (राजस्थान) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचा पुरुष क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. आदर्श बागवाले याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोटा येथील जय मिनेश आदिवासी विद्यापीठात आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा १२ ते १६ जानेवारी या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाच्या पुरुष क्रिकेट संघात अंश ठोकळ, आशुतोष देशमुख, ओंकार बिरोटे, विशाल दराडे, अभिजीत सावळे, अमित राठोड, सुरज मुरमुरे, सुजल राठोड, अश्रफ खान, आर्षद पठाण, आदर्श बागवाले, कार्तिक बालय्या, अविष्कार नन्नवरे, निखिल पवार, रोनक कुमार सिंग, सय्यद वसीम, शेख नुमान, संतोष राठोड या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून डॉ विलास तांगडे आणि संघ व्यवस्थापक म्हणून कल्पना सरकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या खेळाडूंना कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ सुहास यादव, डॉ शंकर धांडे, महेंद्र जाधव, प्रशिक्षक डॉ मसुद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीत दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.