
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस पब्लिक स्कूलच्या साक्षी गायकवाडची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत पोलिस पब्लिक स्कूलच्या साक्षी गायकवाड हिने १९ वर्षांखालील मुलीच्या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीमुळे साक्षीची १६ ते १९ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साक्षीला डॉ रोहिदास गाडेकर, श्रीराम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या निवडीबद्दल शाळेचे संचालक रंजीत दास, मुख्याध्यापिका गीता दामोदरन ,प्रशासक किरण चव्हाण, हसमत कौसर, राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, सचिव डॉ दयानंद कुमार यांनी साक्षीचे अभिनंदन केले आहे.