छत्रपती संभाजीनगर : विभागीय आंतर शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूट ज्युनियर कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे डिफेन्स करिअर संघ राज्य शालेय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या विभागीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत डिफेन्स करियर इन्स्टिट्यूटच्या ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थान निश्चित केले आहे.
या संघात धर्मराज डोंगरे (कर्णधार), श्रीयश सातारे, विश्वनाथ घाटूळे, तन्मय गायके, यश सोनाळे, रितेश लख्खस, शिवम कराळे, मरवीन मॅथिव, यश अरसुले, श्रोतम भोसले या खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा संचालक डॉ कैलास शिवणकर यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले आहे. प्राचार्या मीनाक्षी वडतकर व संस्थेचे संचालक प्रा दिनेश वडतकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.