
धुळे : धुळे येथील जो रा सिटी हायस्कूल व दत्तात्रय मालजी बारी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व मल्लखांब खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच व मार्गदर्शक प्रा भूपेंद्र मालपुरे यांना ‘उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयीन मल्लखांब खेळाडूंच्या निवडक मानसशास्त्रीय आणि शारीरिक बदलावरील समवर्ती प्रदर्शन कार्यक्रमाच्या परिणामांचा अभ्यास’ या विषयात स्वामी विवेकानंद विद्यापीठ, सागर, मध्यप्रदेश येथे पीएच डी प्राप्त झाली.
भालचंद्र मालपुरे यांना डॉ बलवंत सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. मार्गदर्शक डॉ निसार हुसेन यांनी या काळात त्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. डॉ भालचंद्र मोरे, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ आनंद पवार, धुळे शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर बी शिंदे, राजेंद्र बारे, अमित गोराणे, मनोज सोनार, डॉ विजय पाटील यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ, मानद सचिव संतोष अग्रवाल, उपाध्यक्ष विनोद पालेशा, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य ए डी पावरा, उपप्राचार्य पी एस कुलकर्णी यांनी भूपेंद्र मालपुरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.