
छत्रपती संभाजीनगर : शिवछत्रपती महाविद्यायातील खेळाडू शिवानी धांडे आणि प्रणिता मोरे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हँडबॉल संघात निवड करण्यात आली आहे.
जयपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी शिवानी आणि प्रणिता या दोन खेळाडूंचा विद्यापीठ संघात समावेश आहे.
या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रदीप चव्हाण, प्राचार्य डॉ आर पी पवार, उपप्राचार्य डॉ संगीता राजमाने व सुपरवायजर डॉ अश्रूबा गवळी यांनी शिवानी व प्रणिता या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ अर्चना कोल्हे, प्रा किशोरी हिवर्डे, डॉ रणजित पवार व अविनाश वाडे यांचे दोन्ही खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.